Uncategorized

मंगळवेढा पंढरपूर परिसरातील शेतकरी बेरोजगार तरुण व महिलांना सक्षम करण्यासाठी अनिल सावंत यांना उमेदवारी:खा. सुप्रिया सुळे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे गेली पंधरा वर्षे झाले मंगळवेढा परिसरामध्ये आपला उद्योग व्यवसाय करीत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कष्टकरी व तरुण बेरोजगारी लोकांच्या हाताला काम देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. मंगळवेढा पंढरपूर परिसरातील शेतकरी बेरोजगार तरुण व महिलांना सक्षम करण्याचा उद्देशाने शरद पवार यांनी अनिल सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी त्यांना दिलेली आहे.  संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ व संपूर्ण सोलापूर जिल्हा हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधून राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील. येत्या 20 तारखेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून अनिल सावंत यांची चिन्ह तुतारी या तुतारी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन खा. सुप्रियाताई सुळे  यांनी केले. अनिलदादा सावंत यांचे प्रचारार्थ मंगळळवेढा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कीं महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर केलेला असून यामध्ये महिलांना तीन हजार रुपये दरमहा देण्याची ठरवले आहे. त्याचप्रमाणे महिलांना मोफत एसटी प्रवास करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करण्यात येणार आहेत. महागाई ची झळ सर्वसामान्यांना बसत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा दर हा पाच वर्षे सारखाच राहणार आहे. त्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, वाढ केली जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.

पंढरीच्या विठुरायानेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी माळकरी उमेदवार म्हणून अनिल सावंत यांना पाठवले आहे. त्यांना या येत्या 20 तारखेला तुतारी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले.

यावेळी उपस्थित प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर भोसले, काशिगाव चे वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महिला आघाडीचे नेते ताड मॅडम, साहित्यिक श्रीमंत कोकाटे, मंगळवेढातील शहा शेटजी, आधी असंख्य मानेवर यावेळी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close