अभिजीत आबांना मतदान म्हणजेच शिवबाबांना मतदान स्वरूपाराणी मोहिते-पाटील
माढा मतदारसंघातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील गावातून ४० हजारांची लीड अभिजीत पाटील यांना मिळेल: शिवतेजसिंह मोहिते-पाटील
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :–माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की; राज्यातील दडपशाहीचे राजकारण नागरिकांना मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्यावरही दबाव टाकण्याचे काम झाले. मात्र महाविकास आघाडीने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत आपल्या जाहीरनाम्यात विविध योजनांचा समावेश केला आहे. नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील यांना निवडून दिले. त्याच पद्धतीने दूरदृष्टी ठेवून प्रगतीसाठी आणि स्वच्छ कारभारासाठी आबांना मतदान म्हणजेच शिवबाबांना मतदान असे सांगत अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की या मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी कोणतेही विकास काम केले नाही. सत्ता असो किंवा नसो विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या मतदारसंघात काम केले आहे. पंधरा वर्षाचा बॅकलॉक भरून काढला आहे. यामुळे माळशिरस तालुक्यातील १४ गावांनी कायम मोहिते पाटील कुटुंबीयांवर प्रेम केले आहे. मी निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो मात्र मोठ्या दादांनी आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिला की अभिजीत पाटील यांच्या पाठीशी उभे राहावा. या आदेशाचे पालन करून आम्ही अभिजीत पाटील यांचा जोरदार प्रचार करत आहोत. पंढरपूर मधील ४२ गावांमधून अभिजीत पाटील यांना २५ ते ३० हजार आणि माळशिरस तालुक्यातील गावांमधून बारा हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की; राज्यात शरद पवारांनी परिवर्तनाचा एल्गार पुकारला याला साथ देऊन विजयदादांनी क्रांतीकारक निर्णय घेऊन लोकसभा निवडणुकीत यश मिळवले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पक्ष फोडीचे राजकारण झाले. चिन्हही काढून घेतले. या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला काम करायचे आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी पंचसूत्री योजना राबवण्यात येणार आहे. माढा मतदार संघात तीस वर्षात काय विकास केला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगाराची सोय नाही. मतदार संघातील मूलभूत विकास होऊ शकला नाही. यासाठी काम केले पाहिजे. मतदारसंघात केळी संशोधन केंद्राची गरज आहे. माढा,मोडनिंब, करकंब, महाळुंग साठी निधी मिळवून देऊ, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असा विश्वास देत त्यांनी दूध संघ बंद करून जागा विकल्या. शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्ज काढले अशी टीका अपक्ष उमेदवार रंजित शिंदे यांच्यावर केली.
यावेळी त्यांनी मी मोहिते-पाटील यांच्या विचारावर काम करेन मी आमदार होणार नसून शिवतेजसिंह मोहिते-पाटील आमदार होणार आहेत असा विश्वास दिला.
वेळी बोलताना स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की; राज्यातील दडपशाहीचे राजकारण नागरिकांना मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्यावरही दबाव टाकण्याचे काम झाले. मात्र महाविकास आघाडीने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत आपल्या जाहीरनाम्यात विविध योजनांचा समावेश केला आहे. नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील यांना निवडून दिले. त्याच पद्धतीने दूरदृष्टी ठेवून प्रगतीसाठी आणि स्वच्छ कारभारासाठी आबांना मतदान म्हणजेच शिवबाबांना मतदान असे सांगत अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.