अन्यथा विश्व हिंदू परिषद आषाढी वारीत करेक्ट कार्यक्रम करणार-सतिश आरगडे
वारकरी सांप्रदाय टोकाची भूमिका घेणार नाही-जोगदंड महाराज

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-जे मोघलांना -इंग्रजांना जमले नाही ते आघाडी सरकारने करुन दाखविले असुन कोरोनाचे निमीत्त करुन शेकडो वर्षाची आषाढी वारीची परंपरा खंडित केली आहे बाकी सर्व व्यवहार सुरु आहेत.कोरोनाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने शिस्तप्रिय वारकर्यावर लादली जात आहेत हा अन्याय आहे.शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आषाढी वारी मध्ये विश्व हिंदू परिषद करेक्ट कार्यक्रम करेल असा इशारा विश्वहिंदू परिषदेचे सोलापुर विभाग मंत्री सतिश आरगडे यांनी प्रशासनाला दिला.येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि.आमचे नियोजन ठरले असुन वारीत त्याची कृती केली जाईल.
संताना अटक करुन आपराध्यासारखी वागणूक दिली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांची तात्काळ माफी मागीतली पाहीजे. वारकर्यावर लावलेले सारे गुन्हे मागे घ्यावेत,आषाढी एकादशी पासुन चालणारी चातुर्मास सेवा,मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, प्रवचने दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावेत या मागण्या असुन त्या त्वरीत मान्य कराव्यात व वरील प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन मुंख्यमंत्र्यानी सरकारी पुजेसाठी पंढरपूरला येऊ नये अन्यथा विश्वहिंदू परिषद तिव्र विरोध करेल.त्यास प्रशासन जबाबदार राहील.असा ईशारा सतिश आरगडे यांनी दिला.यावेळी जोगदंड महाराजानी वरील मागण्यास पाठींबा दिला मात्र मुख्यमंत्र्यांना सरकारी पुजेला येण्यास विरोध करणार नाही असे स्पष्ट करुन वारकरी सांप्रदाय टोकाची भुमिका घेणार नाही.सद्याच्या परस्थीतीची जाणीव आम्हाला आहे.शासकिय नियमाचे पालन करुन आम्ही नित्य उपक्रम करुन प्रत्येक दिंडीच्या पाच प्रतिनिधींना पंढरपुरात प्रवेश द्यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.या पत्रकार परिषदेस डाँ.जयसिंह पाटील विहिपचे पंढरपुर जिल्हा मंत्री,भाग्यश्री लिहणे,पंढरपुर जिल्हा उपाध्यक्ष, नितिनमहाराज आदमाने(धर्माचार्य संपर्क प्रमुख पंढरपुर)रविंद्र साळे(समरसता, प्रांत सदस्य) आदी उपस्थित होते.