Uncategorized

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा..

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

भगीरथ भालके यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत.  प्रचार सुरु झाला तरी पदाधिकारी यांना भालके यांनी विश्वासात घेतले नाही. त्या मुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.काँग्रेस आयच्या अमर सूर्यवंशी, संदीप माने, गोकुळ धोत्रे,सागर कदम पांडुरंग डांगे, नागेश अधट राव, गणेश शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज विठ्ठल इन येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी उमेदवार अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुभाष भोसले, सुधीर भोसले, संदीप मांडवे, आपचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close