Uncategorized

कवी समाधान देशमुख यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

चांगभलं’ या काव्यसंग्रहाचा व ‘जागर’ या चारोळीसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी होणार!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये वेळापूर पोलीस ठाणे येथे हेड काँस्टेबल पदावर कार्यरत असणारे कवी समाधान देशमुख यांच्या ‘चांगभलं’ या काव्यसंग्रहाचा व ‘जागर’ या चारोळीसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी10:30 वा विठाई लॉन, वाखरी रोड, मारुती शोरूम समोर, इसबावी, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
कवी समाधान देशमुख यांचे मित्र परिवार व आप्तेष्ट मंडळी यांचेकडून आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमास सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते प्रा.डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते डॉ. राजेंद्र दास,सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव,अकलूज विभागाचे पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पंढरपूर विभागाचे पोलीस अधिकारी विक्रांत कदम, श्रीपुर येथील पांडुरंग शुगरचे व्यवस्थापकीय संचालक यशवंतराव कुलकर्णी व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय,नांदेड येथील उपप्राचार्या सौ. कल्पना माणिक बेदरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवप्रज्ञा प्रकाशन सोलापूर यांनी प्रकाशित केलेला. ‘चांगभलं’ं या काव्यसंग्रहात एकूण 61 कवितांचा तर ‘जागर’ या चारोळीसंग्रहामथ्ये एकूण 102 चारोळ्यांचा समावेश आहे. कवी समाधान देशमुख यांनी त्यांच्या कविता व चारोळ्याच्या माध्यमातून कुटुंबव्यवस्था, श्रमाचे ढासळते मूल्य, शिक्षणव्यवस्था, लोकसंख्या, स्त्रियांवरील अत्याचार, बेकारी, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण, जातीयता, संस्कारमूल्ये अशा अनेक विषयांवर भाष्य केलेले आहे. तरी विठ्ठलाची पावन नगरी पंढरपूर येथे संपन्न होत असलेल्या प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहाण्याचे आवाहन कवी समाधान देशमुख मित्र परिवार व शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close