विवेक वर्धिनी मध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगली काव्य महफिल

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-महाराष्ट्राची अस्मिता असणारी माय मराठी म्हणजेच राजभाषा या मराठीदिना निमित्त व कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसा निमित्त पंढरपूर मधील विवेक वर्धिनी विद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षक यांनी काव्य संमेलन आयोजित करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. कवी वि.वा. शिरवडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठीमध्ये दर्जेदार साहित्य निर्मिती केली अनेक काव्यांची निर्मिती केली त्यांच्याच काव्यावर आधारित अनेक कविता प्रशालेतील 9वी अ च्या विद्यार्थिनी.विद्यार्थी यांनी कविता सादर करून आपल्या मराठी भाषेचे महत्व आपल्या काव्यातून व्यक्त केले या कार्यक्रमासाठी साठी प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांची प्रेरणा मिळाली.त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन साहित्य निर्मितीतून आपले योगदान मराठी भाषेसाठी द्यावे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे,
राजुभाई मुलाणी. यांनी केले होते यावेळी शिवाजी येडवे यांनी सुरामध्ये कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन केले. व मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी संजय क्षीरसागर,सुनील विश्वासे, वसंत सातपुते, वैशाली
म्हेत्रे,श्रीकांत चव्हाण, मुख्यालिपीक हनुमंत मोरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.