Uncategorized

इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ अनुप फडे

इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर नूतन पदाधिकारी निवड

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक श्रीकांत कसबे

पंढरपूर – इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधे मावळते अध्यक्ष डॉ.प्रसन्न भातलवंडे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वानुमते इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.अनूप फडे यांची 2023 या वर्षासाठी निवड झाली आहे.

सचिवपदी डॉ.अमृता दोशी यांची तर खजिनदारपदी डॉ.अनुराधा खंडागळे यांची निवड झाली आहे.प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.ऋचा खुपसंगीकर, संपादक डॉ.प्रतिभा देशपांडे यांची निवड झाली आहे.पंढरपूर तालुका आणि परिसरातील दंतवैद्यांची ही संघटना आहे.वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे डॉ.अनूप फडे यांनी सांगितले.संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ.महेश देशपांडे,डॉ.योगेश दोशी, डॉ.अभिजीत खुपसंगीकर,डॉ प्रसन्न फडे, डॉ राहुल आठवले,डॉ वैभव कुलकर्णी,डॉ निनाद जमदाडे आदी उपस्थित होते.मावळते सचिव डॉ.प्रतीक दोशी यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close