दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आमचे संस्थेच्या वतींने “वारकरी चरण सेवा” होणार :जयवंत नायकुडे


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-2008पासून राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल पंढरपूर व जय इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, इंदापूर यांचे वतीने आषाढी यात्रे निमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वाराकऱ्यांची चरण सेवा (चालून पाय दुखत असतील तर पायाची मालिश, पिशव्या घेऊन हात, खांदा दुखत असेल तर हात, खांद्याची मालिश )व आरोग्य सेवा करण्याचे काम केले जाते.यावर्षी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षा कडून आमचे संस्थेस पत्र आले असून आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चरण सेवा द्यावी असे आवाहन केले आहे. यावर्षी 27जून पासून सणसर ता. इंदापूर ते वाखरी पर्यंत ही चरणसेवा (फिजिओ थेरफी )केली जाणार असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयवंत नायकुडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
. 
यासाठी 350 विध्यार्थी, शिक्षक वर्ग, संचालक मंडळ अहोरात्र सेवा करणार असून येणारा सारा खर्च आमची संस्था करणार असून पालखी पंढरपूरमध्ये आल्यानंतर ही चरणसेवा पंढरपूरात केली जाणार आहे. सरगम चौक व गोपाळपूर येथे ही नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. भारूड, पथनाट्यद्वारे आरोग्यविषयीं आमचे विध्यार्थी प्रबोधन करणार आहेत. वारकऱ्यांच्या चरण सेवेसाठी आमच्या संस्थेने सहकार्य करावे हॆ पत्र मुख्यमंत्री सहाय्यता कक्षा कडून आलेने आम्हास विशेष आनंद झाला असल्याचे शेवटी नायकुडे यांनी सांगितले.




