आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे–दिलीपबापू धोत्रे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माझ्या गाव भेटीच्या माध्यमातून मला मिळणारा प्रतिसाद तसेच बेरोजगार युवक तरुण आणि महिला वर्गांच्या मधून मला मिळणारा वाढता प्रतिसाद व मतदारसंघातील आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणावर तसेच विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. पंढरपूर शहर असो पंढरपूर तालुका असो किंवा मंगळवेढा तालुका असो या सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून गेलो आहोत. कित्येक गरजूंना मदत केली आहे. सर्वसामान्य जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेने पाहत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा मध्ये फिरत असताना प्रत्येक गावांमधून वाड्यावस्ती मधून आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. त्यामुळेच माझ्या प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने काही समाजकंटक लोक नशा पाणी करून प्रचार सभेमध्ये अडथळा आणू पाहत आहेत.
प्रचार सभा आटोपल्यानंतर या घडलेल्या प्रकारावर बोलत असताना दिलीप बापू धोत्रे यांनी तेथील जमलेल्या महिलांशी संवाद साधला असता त्या महिला म्हणाल्या की आम्हाला कोणीही प्रलोभन दाखवून येथे बोलावलेले नाही. आम्ही स्वतःहून दिलीप बापू धोत्रे यांचे कार्य पाहून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. असे त्या महिलांनी जाहीरपणे सांगितले. काही विरोधक अशा समाजकंटकांना प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्यासाठी सोडून देतात. असे मनोगत असंख्य महिलांनी यावेळी व्यक्त केले.