जातीचे बांध ओलांडले तरच सामाजिक संघटन बळकट प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी अमोल महापुरे यांना निवडीचे पत्र देताना राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कोडोली:-(वारणानगर)दि. १५ आँगस्ट रविवार सामाजिक संघटन बांधत असताना एकाच जातीपुरते मर्यादित न ठेवता जातीचे बांध ओलांडून सर्वसमावेशक जातींचे संघटन जर बांधले तरच तुमच्या मागणीला व अस्तित्वाला बळकटी येईल अन्यथा एकाच जातीचे संघटन हे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अदखलपात्र ठरुन समाज विकासापासून दूर राहील असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते कोडोली( वारणानगर) या ठिकाणी आयोजित पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेश संघटक पदी माननीय अमोल महापुरे यांची घोषणा करून त्यांना निवडीचे पत्र देऊन वाढदिवसाची भेट देण्यात आली.
यावेळी प्रा.सुभाष वायदंडे व कोडोलीचे सरपंच यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप व सफाई कामगारांना गणवेश वाटप करण्यात आला सदर प्रसंगी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाश वायदंडे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय संभाजी चौगुले कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख माननीय विठ्ठल चौगुले सांगली जिल्हा अध्यक्षा(युवती) सौ शुभांगी साळुंखे उपस्थित होते.
शेवटी आभार मानले संपर्कप्रमुख अमर शिंदे यानी मानले.