पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात वसंतनाना देशमुख यांची उमेदवारी दाखल

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी वसंतनाना दौलतराव देशमुख यांनी आज नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून एक तर अपक्ष एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांचे कडे आज 25 ऑक्टोबर रोजी दाखल केले. वसंतनाना देशमुख पंचायत समितीचे सभापती,, जिल्हा परिषद सदस्य, पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन पदी त्यांची निवड झाली होती.त्यांचा जन संपर्क दांडगा असून त्यांचे उमेदवारीमुळे तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कडून यापूर्वीच भागीरथदादा भालके यांनी अर्ज दाखल केला असून पक्षाचा अधिकृत ए बी फार्म कोणाला मिळणार याबाबत मतदारात उत्सुकता निर्माण झाली असून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली. नाही.
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, विद्यामान आमदार समाधानदादा अवताडे याचेंसाह 93जणांनी 120 उमेदवारी अर्ज नेले असून 29 ऑक्टोबर पर्यँत अर्ज दाखल करणेची अखेरची मुदत आहे.