राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते” हॉटेल ग्रँड “चे आज शुभारंभ”

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी….आज शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर पासून लगत असलेल्या पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर काही मिनिटाच्या अंतरावर सर्व सोयीने उपयुक्त असे पंचतारांकित होटला लाजवेल अशा प्रकारचे हॉटेल ग्रँड चे उभारणी करून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भाविक भक्तांची तसेच पर्यटकांची राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय असलेले हॉटेल ग्रँड हे सुरू केलेले असून या ठिकाणी असंख्य सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते हॉटेल ग्रँड चा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमास राज्यातील विविध पक्षांचे मान्यवर नेतेमंडळी तसेच आमदार खासदार व असंख्य कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.