Uncategorized
14ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे यांचे व्याख्यान
फुले शाहू आंबेडकर विचार मंचाने केले आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने14ऑक्टोबर 2024 रोजी प्रा.डॉ.संघप्रकाश दुड्डे सर(संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर )यांचे व्याख्यान आयोजित केले आहे व्याख्यानाचा विषय ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्म क्रांती ” हा असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे हे असणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एन दोडके सर हे करणार असून सूत्रसंचालनाची जबाबदारी राहुल सर्वगोड यांच्याकडे सोपवली आहे. चंद्रकांत सातपुते सर हे आभार मानणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सायंकाळी5:30 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन फुले शाहू आंबेडकर मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.