Uncategorized
मनसे व नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सन्मान सोहळा संपन्न!


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी–
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे व स्टेशन रोड नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सन्मान सोहळा गाडगे महाराज मठ पंढरपूर येथे संपन्न झाला.
याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी बोलताना म्हणाले की सध्या नवरात्र उत्सव असल्या कारणे वंचित दीनदुबळ्या सर्वसामान्य घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच समाजांतील आई भवानीचे भक्त म्हणून सेवा करणारे,आराधी गोंधळी देवदासी तृतीयपंथींचा सन्मान करण्यात यावा या उदात्त हेतूने मनसेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तसेच सर्व देवी भक्तांचा फराळ वाटप, साडी चोळीचा आहेर देण्यात आली.याप्रसंगी सुमारे ३०० देवी भक्तांचा सहभाग होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की,शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजनाचां लाभ करून देणार,आई भवानी चरणी नतमस्तक होऊन मी आपणास शब्द देतो की आपल्या कोणत्याही अडचणी असल्यास मी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे.आपल मला मतदानरुपी आशिर्वाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमावेळी हरीबरंगुळे,नाना कदम, शशिकांत पाटील,दत्तसिंह रजपूत आदी मान्यवंर मंडळी व आराधी, गोंधळी देवदासी तृतीयपंथीं बहुसंख्येने उपस्थित होते.