रोटरी क्लबच्या वतीने गौतम विदयालय मुलींच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

शौचालय नूतनीकरणासाठी580000 खर्च रोटरी क्लब मिडटाऊन कोल्हापूर रोटरी क्लब जयेशभाई पटेल अकलूज व रोटरी क्लब पंढरपूर यांचे योगदान
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-दि. 27/8/2024 रोजी गौतम विदयालय पंढरपूर येथे रोटरी क्लब मीडटाऊन कोल्हापूर, रोटरी क्लब अकलूज रोटरी कलब सोलापूर व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने मुलिच्या स्वच्छता गृहाचे मुतनीकरण व लोकार्पण करण्यात आले. यवेळी संस्थेचे संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सर्व प्रथम प्रशालेचे क्रीडा शिक्षक नितीन कांबळे सर यांनी शालेय परिचय सांगितला.
त्यानंतर करुणाकर नायक, रमेश खरावकर, जयेश भाई पटेल, नितीन कुदळे, आनंद गोसावी, भारत ढोबळे, श्रीमती लिलाताई बापूराव पाटील, अनुपमा खटावकर, भारती नायक, हरिदास सर,संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व माजी उपनगराध्यक्ष सुनिल सर्वगोड या सर्व मान्यवरांनी संत गाडगे महाराज वस्तीगृह व गौतम विदयालय यांचे महत्व मुलांना सांगितले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे सर, सर्व शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी आणि विद्यार्थीनी उपश्थित होते. व कार्यक्रम संपन्न झाला.
सूत्रसंचलन रुपनरसर यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी मानले.