मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र यांचे वतीने राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
छ. संभाजीनगर – बोड (प्रतिनिधी): जीवन प्रणाली प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेद्वारा साहित्य सम्म्राट आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमीत्त राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनाचे आयोजन दिनांक 25.08.2024 रोजी महात्मा फुले सभागृह डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज नागसेनवन छ. संभाजीनगर येथे दुपारी। ते 4 या वेळेत आयोजित केलेले आहे.
कविसंमेलनाचे उद्घाटक प्रा. डॉ. धोंडोपंत मानवतकर सुप्रसिद्ध साहित्यिक (मंटा) हे असून उद्घाटन सत्राचे अध्यक्ष भिमराव सरवदे, (उपाध्यक्ष-मा.प्र.सू.सा.प. महा), सुत्रसंचालन प्रा.डॉ. चंद्रकांत साळवे (संघटक मा.प्र.सू.सा.प. महा.), प्रस्ताविक प्रा.डॉ. कोंडबा हटकर (सहसचिव मा.प्र.सू.सा.प. महा.) हे करणार आहेत राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनाचे अध्यक्ष राजू वाघमारे (सहसचिव मा.प्र.सू.सा.प. महा.) हे राहणार असून सुत्रसंचालन प्रोफेसर डॉ. विठ्ठल स. जाधव (कोषाध्यक्ष मा.प्र.सू.सा.प. महा.) तर आभार प्रदर्शन धन्यकुमार टिळक सर (सदस्य मा.प्र.सृ.सा.प. महा.) हे करणार आहेत.
मानवातावादी कविसंमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कविवर्य चंद्रकांत वडमोर (अंबेजोगाई), छगन घोडके (लातूर), संजीव कांबळे (बीड), आनंद चोपडे (बेळगाव), नामवंत प्रभे (अमरावती), योगिराज कोचाडे (हिंगणघाट वर्धा), देविलाल रौराळे (अमरावती), डॉ. नंदकिशोर दामोधरे (अमरावती), सिद्धार्थ प्रधान (परभणी), प्रा. आरुण कांबळे वनपुरीकर (सांगली), विद्याधर पांडे (अंबाजोगाई), सुभाष वाघमारे (वालचंद नगर), उत्तम कराळे (नाशिक), प्रा. डॉ. पांडुरंग सुतार (बीड), प्रताप मोरे (बीड), रंजना गायकवाड (अहमदपुर जि. लातूर), धिमान प्रा.देवानंद पवार (छत्रपती संभाजीनगर), सुजित कांबळे (सांगली), पंडित कांबळे (उस्मानाबाद), व्ही. एस. गायकवाड (उस्मानाबाद) प्रा. डॉ. शिवप्रसाद घोडके (लासूर स्टेशन, ता. गंगापुर जि.छ. संभाजीनगर), सत्यशोधिका आम्म्रपाली पारवे (मुंबई) इत्यादी सहभागी होणार आहेत.
तरी साहित्यिक व साहित्यरसिक बंधु भगिनींना विनंती करण्यात येते की, या मानवतावादी कवि संमेलनामध्ये उपस्थित रहावे, असे निवेदन चंद्रप्रकाश शिंदे (अध्यक्ष म.प्र.सृ.सा.प महा.) प्रा. शंकरराव चव्हाण (उपाध्यक्ष म.प्र.सृ.सा.प महा.) मधुकर पवळे (सचिव म.प्र.सृ.सा.प महा.) सुरज साठे, प्रा. भारती फुलेकर, डॉ. जयश्री शिदे, डॉ. सुनिल गायकवाड, प्रा.डॉ. बाबासाहेब जावळे, सुभाष गवळी, इत्यादी राज्य सदस्य यांनी केले आहे.