पुरोगामी संघर्ष परिषदेची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पुरोगामी संघर्ष परिषदेची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर केल्यानंतर नियुक्तीपत्र देऊन सत्कार करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे प्रियंका कांबळे,कोमल कांबळे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुरोगामी संघर्ष परिषदेची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पुणे:-(बिबेवाडी)-:-पुणे जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकारणी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी बिबेवाडी येथे संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण प्रसंगी जाहीर केली.
जाहीर केलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे अविनाश शिवाजी कांबळे (राहणार बिबेवाडी पुणे ३७) यांची पश्चिम महाराष्ट्र (युवक) अध्यक्ष, खंडू दत्तू पवार पुणे जिल्हा अध्यक्ष (वरिष्ठ) (व्ही.आय. टी. कॉलेज अप्पर डेपो पुणे), प्रवीण काकासो पवार (युवक) जिल्हाध्यक्ष(गंज पेठ), दत्तात्रय भगवान पवार पुणे शहराध्यक्ष(कात्रज) सदर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रत्र देऊन प्रा सुभाष वायदंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कोमल कांबळे, प्रियंका कांबळे, मेजर अमित शितोळे, शरद कदम, भाग्यश्री शिंदे ,नंदा भोंडे, शोभा शिंदे, गीतांजली पवार, पुनम शितोळे, रोहिणी कदम, राजू लठ्ठे, विजय लठ्ठे, भरत लठ्ठे, सिद्धेश्वर कांबळे, अभिजीत पवार इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.