Uncategorized

राज्य सरकारच्या निर्णया विरोधात फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाने घेतली हरकत

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर / प्रतिनिधी

शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनावारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी अनुसूचित जातीसाठी खर्च करण्यासाठी असतो. त्या निधीतून मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करणे चुकीचे असल्याचे मत फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाने व्यक्त करत हरकतीचे निवेदन राज्य सरकारला पाठवण्यासाठी पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, ऍडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोड, भालचंद्र कांबळे, एल. एस सोनकांबळे,माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये,,  माजी मुख्याध्यापक दशरथ दोडके, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, सेवागिरी गोसावी, देविदास कसबे ,माजी नगरसेवक उमेश पवार, गौतम साबळे, गुरु दोडिया, नानासाहेब लोखंडे, हनुमंत बंगाळे, सुनील दंदाडे, बापू डावरे यांच्यासह विचार मंचाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे म्हणाले की,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. त्यामार्फत मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना राबविण्यात यावी. असे असताना अनुसूचित जातीचा निधी या यासाठी वापरणे म्हणजे अनुसूचित जातीवर अन्याय आहे ज्या कारणासाठी हा निधी असतो, त्याबर तो खर्च केला जात नाही. राज्यात अनुसूचित जातीसाठी असलेल्या निधीतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही. पीएचडी संशोधकांना फेलोशिप वेळेत दिली जात नाही. रमाई घरकुल, अत्याचारग्रस्त पीडित, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे १४ जुलै २०२४ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. शासनाने ही मागणी त्वरित मान्य करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close