राष्ट्रीय समाज पक्ष सांगोला व अक्कलकोट विधान सभापदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न होणार
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मिशन २०२४ राष्ट्रीय समाज पक्षची सांगोला व अक्कलकोट विधान सभा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न होणार असल्याची माहिती अजित पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष निरीक्षक – सांगोला विधानसभा व अक्कलकोट विधानसभा यांनी पत्रकाद्वारे दिली.राष्ट्रीय समाज पक्ष येणारी निवडणूक स्वबळावर लढणार असून 109विधानसभा मतदारसंघसाठी पक्षांने निरीक्षक नेमले आहेत. अजित पाटील यांची सांगोला व अक्कलकोट विधानसभा निरीक्षक निवड म्हणुन राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
सांगोला विधानस भाबुधवार दि.24/07/2024 रोजी दुपारी 12:00 वाजता मदने टेडर्स, महुद चौक सांगोला येथें तर अक्कलकोट विधानसभा गुरुवार दि.25/07/2024 रोजी दुपारी 12:00 वाजता साहिल पॅलेस अक्कलकोट या ठिकाणी होणार आहे.
सांगोला व अक्कलकोट मतदार संघाची निवडणूक पक्ष मोठ्या ताकदीने लढविणार आहे… येत्या काही दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्वाखाली मोठ्या मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले