माता रमाई जयंती निमित ई-श्रम नोंदणी कार्ड व महिलांचा प्रबोधात्मक कार्यक्रम संपन्न
भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देश्यीय सामाजिक संस्था व रमामाता मंडळ यांनी उत्सहात साजरी केली रमाई जयंती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देश्यीय सामाजिक संस्था व रमामाता मंडळ यांचे वतीने ७फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती उत्सहाने साजरी करण्यात आली.भिमशक्ती चौक संतपेठ येथे दिवसभर श्री जी सर्व्हिस यांच्यावतिने महिलांना ई-श्रम कार्ड काढून देण्याचा कार्यक्रम रममाता महिला मंडळातील जेष्ठ माजी अध्यक्षा उन्नता कदम, विद्याताई भोरकडे, पौर्णिमा जाधव, मिराताई भोरकडे यांच्या उपस्थीतीत करण्यात आले .घरकाम करणार्या महिला,ब्युटी पार्लर, वृतपत्र विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते,हाँटेल चालक,विडी कामगार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, प्रिटिंग कामगार,, सेंट्रींग,लोहार,सुतार,विणकर,ईलेक्ट्रीशयन,नाभिक,पेंटर,प्लंबर ,मँकेनिक ,विटभट्टी,बाधकाम कामगार भाजी विक्रेते, फळे विक्रेते,अँटो रिक्षाचालक,मच्छिमार,पशूपालन करणारे,शिलाई मशिन कामगार,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,सुरक्षा कर्मी, लेदर,मिठ व साँ मिल कामगार,हातगाडा कामगार,महिला बचत गट,लहान व सिमांत शेतकरी/शेतमजूर व व सर्व असंघटीत कामगाराची आँनलाईन नोंदणी केली जाते. आज त्याचा १०७ गरजूनी लाभ घेतला.
सायंकाळी ७वाजता रमामाता महिला मंडळाचे वतिने प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व सौ.उज्वलाताई भालेराव, माजी नगरसेविका लतिकाताई डोके,सौ अनिताताई सुजितकुमार सर्वगोड, सौ लताताई संजय निंबाळकर,सौ.जयश्रीताई डी.राज सर्वगोड यांचे हस्ते माता रमाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांचे हस्ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थीत महिलांना माता रमाई संबधात विशेष माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले.अखंड न्युज चँनलच्या संपादिका सुरेखाताई भालेराव-नागटिळक,सौ.साधनाताई भोसले,उज्वलाताई भालेराव, अनिताताई सर्वगोड कु.दीक्षा भोरकडे,कु.दीक्षा आठवले, कु.मानसी बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त केले.सुत्रसंचलन विद्या अरुण सर्वगोड मँडम यांनी केले.शेवटी चिवडा व जिलेबी वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी जेष्ठ सदस्या वासंती सर्वगोड, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, राहुल (दादा) मोरे ,नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, अमोल डोके, अरुण सर्वगोड, गुरु दोडीया ,वंचित चे रविराज सर्वगोड, शिवाजी चंदनशिवे, गणेश शिंदे, दत्ता चंदनशिवे, रोहन खरात ,सुमित पवार, बाबासाहेब चंदनशिवे, सिद्धार्थ सरवदे, लखन लामकाने, ऋषिकेश भोरकडे, अजय चंदनशिवे ,बापु भोसले ,रशिद भाई मुलाणी ,योगेश सर्वगोड ,रज्जाक तांबोळी ,धर्मपाल जाधव, ज्ञानेश्वर ढवळे ,बाळासाहेब सर्वगोड ,मंडळाचे सर्व जेष्ठ मार्गदर्शक व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.