स्वयंदिप सोशल फॉउंडेशन पुणे यांच्या मार्फत गौतम विद्यालय येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-स्वयंदिप सोशल फॉउंडेशन पुणे यांच्या मार्फत गौतम विद्यालय पंढरपूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप .करण्यात आले. सदर कार्यक्रम नंदकुमार वाघमारे सर मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर यांच्या अध्यक्षते खाली झाला.

स्वयंदिप सोशल फॉउंडेशन पुणे च्या अध्यक्षा मानसीताई वानखेडे मॅडम व त्यांच्या सर्व सहकारी अरुनिताताई गायकवाड, नंदाताई उबाळे मॅडम, मीराताई बोरकर मॅडम,माने मॅडम यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. यावेळी स्वयंदीप फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती देताना मानसीताई वानखेडे मॅडम म्हणाल्या जीवनात शिक्षणा बरोबरच शीलाला खूप महत्व आहे. माणूस कितीही विद्वान असला तरी त्यांचेकडे शीलाचे पालन होत नसेल तर त्याच्या विद्वतेला काडीची किंमत राहत नाही. शिक्षणा बरोबरच शीलवान असणे महत्वाचे आहे त्याच बरोबर विध्यार्थ्यानी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

यावेळी आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुबंई संस्थेचे कार्यकारी सदस्य सुनिल सर्वगोड, फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष सुनील वाघमारे, गौतम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दशरथ दोडके सर, भीमशक्ती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक संतोष सर्वगोड, विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर, जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे,तसेच प्रा.सुरेखाताई नागटिळक भालेराव मॅडम,गौतम विद्यालयाचा स्टाफ धनाजी सावंत सर,श्रीमती वैशाली आराध्ये मॅडम, अण्णासाहेब कवडे सर, दत्तात्रय गिड्डे सर, सिद्धनाथ रुपनर सर, फकिरा कसबे सर,शिक्षकेतर कर्मचारी क्षेमेंद्र झाकडे धर्मेंद्र जानराव, सतीश माने, राहुल ढवळे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कवडे सर यांनी केले तर प्रास्तविक रुपनर सर यांनी केले तर आभार श्री गिड्डे सर यांनी मानले.



