कलाशिक्षक विलास जगधने यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर
पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-गौतम विद्यालय येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक विलास जगधने यांना कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल “जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी व सरचिटणीस शालिग्राम भिरूड यांनी पत्राद्वारे दिली.
अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन (कला शिक्षण परिषद) दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदाय शिक्षण प्रसारक समितीचे भक्त निवास, नवीन सोलापूर रोड (सोलापूर बायपास) पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय अधिवेशन ( कला शिक्षण परिषद) च्या निमित्ताने राज्यातील कलेच्या जीवनभर भरीव योगदान दिल्याबद्दल दहा कलाशिक्षकांना ” जीवन गौरव पुरस्कार २०२५ तर कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल २२ कलाशिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात येत आहे
सदर पुरस्कार अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मानयवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.