पंढरीत राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती साजरी होणार

पंढरीत राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती साजरी होणार
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांचे वतीने राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती साजरी होणार असून बुधवार दि.२६ जुन २०२४ सकाळी ०९.३० वाजता छत्रपती शिवाजी महराज चौक पंढरपूर येथे राजर्षी शाहुमहाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार असून विश्वजीत घोडके (साहेब) वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरपूर शहर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5.30वाजता “राजर्षी शाहू महाराज व सामाजिक न्याय “या विषयायावर विठ्ठल इन सभागृहात व्याख्यान होणार असून प्रशांत जाधव . मुख्याधिकारी न.पा. पंढरपूर यांचे हस्ते उद्धघाट्न होणार आहे.प्रमुख वक्ते प्रा.डॉ. किशोर खिलारे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अमरजीत पाटील,सी.डी.सी. व जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा,अॅड. विनायक सरवळे पंढरपूर हें असणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनिल वाघमारे अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर हें असणार आहेत. व्याख्यानचे प्रास्ताविक अॅड. विकास भोसले हें करणार असून सुत्रसंचलन दत्तात्रय पाटोळे (सर) हें करणार आहेत.
तरी या कार्यक्रमांस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. किर्तीपाल सर्वगोड उपाध्यक्ष,भालचंद्र कांबळे उपाध्यक्ष,जितेंद्र बनसोडे सचिव,डी.एन. दोडके सर खजिनदार,डॉ. सिकंदर ढवळे सहखजिनदार,अॅड. किशोर खिलारे सहसचिव,राजेंद्र पाराध्ये (सर) प्रसिध्दी प्रमख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.