नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या माढा तालुका अध्यक्षपदी रोहीत रावडे यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
करकंब / प्रतिनिधी – अंजनगाव. खे तालुका माढा येथील सामाजिक कार्यकर्ते रोहीत रावडे यांची नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या माढा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांच्या आदेशानुसार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच सामाजिक कार्याची आवड आणि दमदार संघटन कौशल्य असलेले रोहित रावडे यांच्या सारख्या कणखर व्यक्तीची निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
निवड झाल्यानंतर रोहित रावडे यांनी संघटनेच्या ध्येयधोरणास अधिन राहून संघटन कौशल्याच्या आधारे संघटनेचे कार्य तालुकाभर पोहचवून संघटना अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले.या निवडीवेळी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक , मुरलीधर गायकवाड , पंढरपूर तालुका संपर्क प्रमुख महेश कांबळे , युवा नेते अमित गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक नवरे , मसाजी नाईकनवरे, योगेश इंगळे,धनाजी नाईकनवरे, कुणाल सुर्यवंशी, योगेश नाईकनवरे,विश्वास रावडे, आरबाज मुलाणी, ऋषिकेश लंगर, सागर नाईकनवरे, राजरत्न नाईकनवरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.