पुरोगामी संघर्ष परिषदेचे भुदरगड तहसीलदार यांना निवेदन
मागण्या मान्य न झाल्यास धडक मोर्चा काढणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
भूदरगड:- सोमवार दि.१९/७/२०२१ पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने भुदरगड तालुका तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे यांना विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष प्रकाश वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
सदर निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत .
कोरोना काळाचा विचार करता मायक्रोफायनान्स कडील एक लाखाच्या आतील सर्व कर्ज माफ करण्यात यावीत, मायक्रो फायनान्स कडील जबरदस्तीची कर्ज वसुली थांबवून व्याज आकारणीची चौकशी करून त्यांचेवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. विधवा, परितक्त्या, शेतमजूर इत्यादी महिलांना संसार नव्याने सावरण्यासाठी राष्ट्रीय बँकांच्या कडून बिगर व्याज, बिगर जामीनदार, व विनातारण एक लाख रुपयांचे कर्ज दीर्घ मुदतीचे ताबडतोब मिळावे.
तसेच त्यांना कोरोना काळाचे मानधन म्हणून पुढील दोन वर्षासाठी दरमहा २०००/- ( दोन हजार रुपये) मिळावेत .
मायक्रो फायनान्स च्या जबरदस्ती कर्जवसुलीमुळे महिलांचे जीवितास धोका झाल्यास सदर कंपनीचे वसुली अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत.
सदर मागण्या जर पंधरा दिवसाचे आत मंजूर नाही झाल्या तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ही देण्यातआला.
सदर शिष्टमंडळात पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चौगुले, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल चौगुले ,
जिल्हा उपाध्यक्षा(म.आ.) वैशाली कांबळे ,कागल तालुका अध्यक्षा रुक्मिणी आवळे ,सुधाकर कांबळे, कागल तालुका अध्यक्ष प्रभू जिरगे तसेच युवा नेते अनिकेत चौगुले इत्यादींचा समावेश होता.