श्री संत नरहरीमहाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाज भुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-श्री संत नरहरीमहाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप महाराष्ट्र राज्य चा समाज भुषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे यांना जाहीर झाला असून ८ जुन रोजी मोहोळ येथे मान्यवरांचे उपस्थित पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे..
सर्व शाखीय सोनार समाजाच एकञीकरण व संत नरहरीमहाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदैव कार्यरत आसणारे समाजातील स्वयंभू नेतृत्व म्हणून पुढे आलेले जेष्ठ समाज सेवक काकासाहेब बुराडे यांच्या कार्याची दखल श्री संत नरहरीमहाराज प्रतिष्ठान ने घेऊन त्यांना समाज भुषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात येणार आसल्याची माहीती संतोषशेठ सोनार मोहोळ यांनी दिली
काकासाहेब बुराडे यांना समाज भुषण पुरस्कार जाहीर होताच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे