स्वेरी आणि सलाम किसान यांच्यात सामंजस्य करार प्रस्थापित

छायाचित्र- स्वेरी अभियांत्रिकी आणि सलाम किसान मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापन झाला असून स्वाक्षरी प्रत दाखविताना डावीकडून रामचंद्र माशाळे, रोहित पाटील, अक्षय खोब्रागडे, स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. ए.पी. केने, डॉ. मिनाक्षी पवार.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मुंबईच्या ‘सलाम किसान’ आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित ‘स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार स्थापित करण्यात आला. या कराराचा फायदा ड्रोन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांना होणार आहे. स्वेरीच्या माध्यमातून वाढत्या सामंजस्य करारामुळे स्वेरीच्या संशोधन विभागाला आणखी गती येत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
मुंबई मधील सलाम किसान ही कृषी संबंधित सेवा पुरवणारी आणि ड्रोन तंत्रज्ञानात अनुभव असलेली कंपनी आहे. या करारामुळे सलाम किसान मुंबई ही संस्था महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘कृषी तंत्रज्ञान’ आणि ‘ड्रोन ऑपरेशन्स’ च्या क्षेत्रात आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार आहे तसेच कंपनीने स्वेरी महाविद्यालयात रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण देखील भविष्यात सुरू करण्याची ग्वाही यावेळी दिली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना ड्रोन तंत्रज्ञानाच्या बाबतीत व्यावसायिक ज्ञान मिळेल. विशेषतः हा करार कृषी क्षेत्रातील ड्रोन संशोधनाच्या आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामंजस्य करारामुळे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होईल तसेच या कराराच्या मदतीने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील ज्यामुळे ते विद्यार्थी कृषी तंत्रज्ञान आणि ड्रोन ऑपरेशन्स यामध्ये उत्कृष्टता साधू शकतील. या सामंजस्य करारावर सलाम किसान मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे, विकास अधिकारी रोहित पाटील आणि ट्युटर, एमएसआर आयएएस अकॅडमी, सोलापूरचे रामचंद्र माशाळे व स्वेरी तर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी मदत मिळणार असून कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे, हे मात्र नक्की! या सामंजस्य कराराचे स्वागत स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, सामंजस्य करार समन्वयिका डॉ. नीता कुलकर्णी इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी केले आहे.