Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी पूनम ठोकळे तर उपाध्यक्षपदी प्रियांका गवळी यांची निवड

प्रियंका गवळी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सांगोला* :- दि. २६ जूलै सोमवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्या (महिला आघाडी) सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी पूनम अनिल ठोकळे(कडलास)तर उपाध्यक्षपदी प्रियांका शिवाजी गवळी(मेडशिंगी) यांची निवड करण्यात आली. राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे निवडीचे पत्र सांगोला तालुका अध्यक्षा वर्षा गडहिरे यांनी त्यांना नुकतेच दिले. निवडीनंतर तालुकाध्यक्षा वर्षा गडहिरे यांनी प्रियांका गवळी व पूनम ठोकळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देताना म्हणाल्या महिलांवरील अन्यायाच्या विरोधात लढत असताना टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल पण न्याय मिळवून द्या.