Uncategorized

महाराष्ट्रातील कोळी समाजाचे मतदार कधीच भाजपाला साथ देणार नाहीत !! – गणेश अंकुशराव

भाजपाला पाठींबा देणार्‍या कोळी महासंघाच्या आमदार रमेश पाटलांना गणेश अंकुशराव यांचा खणखणीत इशारा !

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपुर : 29 प्रतिनिधी
‘‘कोळी महासंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला कोळी समाज नव्हे. जिल्ह्यातल्या कोणत्याही समाज बांधवांना विश्वासात न घेता लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणारे रमेश पाटील कोण? ते सोलापूर जिल्ह्यातल्या अथवा महाराष्ट्रातल्या आदिवासी कोळी समाजाचे मालक नाहीत.’’ असा खणखणीत इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आ.रमेश पाटील यांना दिला आहे. कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील हे 25 एप्रिलला सोलापूरमध्ये आले तेंव्हा त्यांनी समाजाच्या प्रश्नाचे ज्ञान नसणार्‍या एका अज्ञानी कार्यकर्त्याला माध्यमातुन कार्यक्रम घेऊन भाजपाचे उमेदवारास लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

आमदार रमेश पाटील यांनी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणत्राचा प्रश्न सोडवतो म्हणून भाजपाकडून आमदारकी पदरात पाडून घेतली आहे. प्रश्न मात्र सोडवला नसल्यामुळे समाजाची फसगत झालेली आहे. त्यांना समाज नेता मानत नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या प्रश्नाचे आमदार रमेश पाटील यांना ज्ञान नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्या मर्जीतले कांही कार्यकर्ते ठेवलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुका आल्या की महाराष्ट्रभर फिरून पाठिंबा दिल्याचे पक्षाला दाखवतात. त्यांच्या भाषणामध्ये फक्त मोदींसाठी भाजपाला मतदान द्या असे म्हणत आहेत. समाजाच्या प्रश्नाविषयी त्यांनी वाच्यताही केलेली नाही. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र कोळी जमातीच्या अस्मितेचा विषय आहे अशा संवेदनशील प्रश्नावरती त्यांनी वाच्यताही केलेली नाही.

2014 व 2019 ला राज्याच्या 31 जिल्ह्यातील 45 लाख कोळी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला मत देऊन सत्तेत आणले होते तरी गेल्या दहा वर्षांमध्ये कोळी समाजाच्या संवेदनशील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांनी एक तासाची वेळ दिलेली नाही. तसेच कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला आले असता सर्व संघटनांच्या प्रतिनिधी ना भेटण्यासाठी वेळ दिली मात्र जिल्ह्यातल्या महादेव कोळी समाजाच्या प्रतिनिधीला वेळ दिली नाही .अपमानित केले आहे .या अपमानाचा बदला समाजाचा घेतल्याशिवाय राहणार नाही. आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक मंजुरी मिळूनही अद्याप झाले नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्याकडे लक्ष दिले तर भाजपाने कोळी समाजावर अन्याय केलेला ठळकपणे दिसून येईल. त्यामुळे भाजपानेही आता कोळी समाजाला गृहीत धरू नये तसेच आमदार रमेश पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाज बांधवासह सबंध महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या मतदार बंधु-भगिणींनी भारतीय जनता पार्टीला मतदान करू नये. असे आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close