जयभीम तरुण मंडळ,अनवली यांचे वतीने भीमजयंती मोठ्या उत्सवाने साजरी

सायली कसबे उत्कर्षी कसबे आरोही भंडारे,श्रेया, तनुजा गायकवाड संबोधी भंडारे या विध्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-दि.२९/०४/२०२४रोजी जयभीम तरुण मंडळ,अनवली ता.पंढरपूर यांचेवतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणेत आली. यानिमित्त प्रबोधनचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाचे सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सायली कसबे उत्कर्षी कसबे आरोही भंडारे,श्रेया, तनुजा गायकवाड संबोधी भंडारे या विध्यार्थिनींनी भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे श्रीकांत कसबे, संपादक जोशाबा टाईम्स, ऍड. रोहित एकमल्ली (एन डी. एम. जे.)सागर गायकवाड प. म. अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी आपले विचार व्यक्त केले.
सम्राट अशोक फाउंडेशन पुणे येथील पत्रकारिते साठी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार श्रीकांत कसबे यांना मिळालेबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ऍड. रोहित एकमल्ली (एन डी. एम. जे.) यांचा सत्कार
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच वल्लभ घोडके हें होते सदस्य संजय माळी, बीरुदेव कोकरे, दिगंबर भोसले ,.विजय कुलकर्णी सर,महादेव माळी, सुभाष भोसले .सोमनाथ बनसोडे,पोलीस पाटील तौफिक शेख,दादा घोडके, पांडू घोडके, ग्रामपंचायत सदस्य,पोलिसपाटील व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
सागर गायकवाड प. म. अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांचा सत्कार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन भंडारे सर यांनी केले व सुत्रसंचलन मा.सुरेश घोडके सर यांनी केले.
मार्गदर्शक सुनील वाघमारे यांचा सत्कार ऍड. रोहित एकमल्ली यांनी केला.
अध्यक्ष नितीन ढोबळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भंडारे -सचिव -,सुरज भंडारे, खजिनदार – वैभव भंडारे – सदस्य , तुकाराम भंडारे,रोहित भंडारे आदित्य भंडारे श्रीकांत भंडारे,विशाल भंडारे,अमोल भंडारे,विक्रमशील वाघमारे,अतुल भंडारे,अमर भंडारे,धीरज कांबळे,अमित भंडारे,सिद्धार्थ भंडारे, अक्षय भंडारे महादेव भंडारे,संदेश शिंदे, सुदाम भंडारे,यार भंडार,अतूल कांबळे, सत्वशील भंडारे नवनाथ भंडारे (मेंबर), लक्ष्मण चंदनशिवे, ऋत्विक भंडारे, समाधान भंडारे, प्रणलं भंडारे विकास भंडारे, चंद्रकांत भंडारे, सुभाष भंडारे, सुकदेव भंडारे, रोहित भंडारे, सुहास भंडारे,सिद्धनाथ श्रीमंत भंडारे,पांडुरंग लोखंडे,विनोद भंडारे,हणमंत चंदनशिवे, सिद्धनाथ आबा भंडारे, नवनाथ आण्णा भंडारे, यांनी सुनील वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले.