पंढरपूर नगरपरिषद च्यावतीने प्रदक्षिणा मार्गावर 2 कोटी 25 लाख खर्चाच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभ
शहरातील प्रदक्षिणा मार्गासह व उपनगरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणार -आमदार प्रशांतराव परिचारक

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर-प्रदक्षिणा मार्गावरील रस्ता डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करावा अशी मागणी शहरातील नागरिक व भाविकाकडून वारंवार केली जात होती याची दखल घेऊन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती त्यानुसार पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने प्रदक्षिणा मार्गावर डांबरीकरण करण्यात येणार असून 2 कोटी 25 लाख खर्चाच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गोपाळकृष्ण मंदिर, नाथ चौक व कालिका देवी मंदिर येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष श्वेता नीलराज डोंबे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट,माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामनराव बंदपट्टे ,पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर ,मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नगरसेवक विक्रम शिरसट, राजाभाऊ सर्वगोड, संजय निंबाळकर,सुप्रिया डांगे,सुजाता बडवे, नगरसेवक डी राज सर्वगोड, विवेक परदेशी विजय विरपे, माजी नगरसेवक निलराज डोंबे, माजी नगराध्यक्ष हरिष ताठे, नगरअभियंता नेताजी पवार,सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम बोहरी, अमोल डोके, नवनाथ रानगट ,संजय शहाणे, बसवेश्वर देवमारे, रा पा कटेकर, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे ,शैलेश आगवणे, ओंकार जोशी, ओंकार वाळूजकर,बशीर तांबोळी, इकबाल बागवान,उपस्थित होते.