Uncategorized
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रातिष्ठानच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे वाहतूक शाखेच्या महिला पोलीसांनी केले पूजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर – महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने 133 व्या जयंती महोत्सवा निमित्त जयंती समितीच्या वतीने रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाहतूक शाखेचे महिला कर्मचारी सविता थोरात आणि जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रणिता भालके यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा उजवला भालेराव,माजी नगरसेविका शकुंतला नडगिरे, अंगणवाडी सेविका नागिण साबळे, लक्ष्मी सर्वगोड, राजश्री सर्वगोड व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि. राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे सर, वाहतूक पोलीस प्रविण सोनवले, सतीश रणदिवे, सुरज पावले, संजय सातपुते, संजय घोडके सर, ऋषिकेश भालेराव यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समिती अध्यक्ष वंदनाताई कसबे, सचिव सोहन जैसवाल, विलास जगधने सर, भाई नितीन काळे, कार्याध्यक्ष : राबिया शेख, विनोद धुमाळ, स्वागताध्यक्ष : अजिंक्य देवमारे, उपाध्यक्ष : रिहाना आतार, नूरजहॉं फकीर, शरीफा पठाण, रोहित जाधव, इकबाल फकीर, विकी कांबळे, सहसचिव -ज्ञानेश्वर कांबळे सर, खजिनदार – प्रतिक कुंभारे, सहखजिनदार : संतोष खिलारे, निमंत्रक -प्रथमेश सर्वगोड, लखन जाधव, संघटक -आदम बागवान, रोहित माने, सोमनाथ सोनवले, समीर मोदी, प्रसिध्दी प्रमुख : मयूर शिंदे, अमित जाधव, सल्लागार- प्रा. सुदाम गायकवाड, दिलीप देवकुळे, श्रीकांत कसबे, रामदास दादा सर्वगोड, ऍड. राहुल तपकिरे, विशाल आर्वे, आनंद थोरात, विकास वाघमारे, निशा फुले देवमारे, प्रा. रविराज कांबळे, अण्णा धोत्रे, सुरेश नवले, मिराताई सरवदे, बंटी वाघ, डी. बी. कांबळे सर, प्रा. सागर शिवशरण, आशाताई बागल, प्रकाशबुवा अभंगराव, नवनाथ गायकवाड सर, शिवाजी मेडशिंगीकर सर यांनी परिश्रम घेतले.
