पुरोगामी संघर्ष परिषदेने काळे बॅनर दाखवून अण्णाभाऊ चे नाव वगळण्याचा केला जाहीर निषेध

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सांगली*:-दि.५ जानेवारी पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीतून केंद्रीय समाजकल्याण खात्याने वगळण्याच्या निषेधार्थ काळे बॅनर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळणाऱ्या समितीला बरखास्त करण्याची मागणी करुन सांगलीचे जिल्हाधिकारी यांना जाहीर निषेध नोंदवत असल्याचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये अण्णाभाऊंच्या नावाचा ताबडतोब समावेश न झाल्यास कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे, सांगली जिल्ह्याच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कु. नयना लोंढे, सांगली जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख लखन वायदंडे, मिरज तालुक्याचे अध्यक्ष भास्कर खिलारे, सांगली जिल्ह्याच्या संघटिका नंदिनी वाघमारे ,सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस सर्जेराव भंडारे, कृष्णदेव कांबळे, जिल्हा नियोजन कमिटीचे अध्यक्ष विजयराव सौंदडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.