उमा शिक्षण संकुलाचा वार्षिक पारितोषिक व पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : (१० मार्च २०२५ )श्री.पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उमा शिक्षण संकुलातील उमा महाविद्यालय व उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालय पंढरपूर,चा वार्षिक पारितोषिक व पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सहाय्यक कुलसचिव,साहित्यिक कवी डॉ.शिवाजीराव शिंदे यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.तसेच ‘अभिनव भितीपत्रकाचे‘ प्रकाशन प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक, कवी डॉ.शिवाजीराव शिंदे यांनी “विद्यार्थ्यांनी शिक्षित होण्याबरोबर सुशिक्षित व्हावे. हरवत चाललेली माणुसकी जपावी. आपल्या आई-वडिलांप्रती कायम कृतज्ञता बाळगावी.मोबाईलचा वापर कमी प्रमाणात करून साहित्याचे वाचन करावे.यातून स्वतःचा व समाजाचा विकास करावा असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी ” नवीन शैक्षणिक धोरणानुसार रोजगाराभिमुख शिक्षण आणि सामाजिक मूल्ये यांच्या संस्कारातून विद्यार्थी सक्षम आणि आत्मनिर्भर होवून त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज विकसित व्हावा” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी आपल्या मनोगतातून”सारे जग बदलले, जगण्याची समीकरणं बदलली, माणसांनी मनामध्ये सूडाची भावना न ठेवता सर्वांनी एकमेकां प्रति माणुसकीने वागावे. तेव्हाच समाज माध्यमांमधून आपणाला प्रेरक व चांगले विचार ऐकायला वाचायला मिळतात. असे सांगितले .या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी वार्षिक अहवाल वाचनातून महाविद्यालयाचा सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. विद्यापीठ परीक्षेत आणि क्रीडा यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव परिचारक,संस्थेचे सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड, उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .विद्युलता पांढरे, माजी प्रभारी प्राचार्य पवार एम एस याबरोबरच उमा शिक्षण संकुलातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बागवान एन एस यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ दत्ता सरगर, प्रा.सौ. शेंडगे व्ही व्ही यांनी केले.उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सविता दूधभाते यांनी मानले.