समाजाच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी माणुसकीची डिग्री संपादन करावी.— डॉ. रामदास नाईकनवरे
श्रीराम जुनियर कॉलेज आटपाडी मध्ये इ.१२ वी वर्गाचा सदिच्छा समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
आटपाडी-ता.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. सदिच्छा समारंभप्रसंगी कला व विज्ञान महाविद्यालय व श्रीराम जु. कॉलेज चे प्र.प्राचार्य डॉ. रामदास नाईकनवरे यांनी अध्यक्षीय
मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षेत उंच भरारी घेऊन आपले करिअरचे विविध मार्ग निवडावे. ते निवडत असताना जिद्द, मेहनत, चिकाटी, व अभ्यास यांचे सातत्य नेहमी ठेवावे.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये मानवतेची बीजे पेरावीत. जीवनामध्ये नेहमीच संयम बाळगावा. नम्रता ठेवावी. इतरांचा आदर करावा. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक वेळी जिंकणाराच श्रेष्ठ ठरतो असं नाही. तर नसतो तर ठरवून हरणारा सुद्धा त्याहून अधिक श्रेष्ठ असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विदयार्थ्यांनी शैक्षणिक डिगऱ्यांबरोबरच समाजाच्या विद्यापीठामधून माणुसकी ची डिग्री ही संपादन करावी. असे आवाहन अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रामदास नाईक नवरे यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिवाजी पॉलिटेक्निक आटपाडीचे प्राचार्य, प्रा.ओंकार कुलकर्णी हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपला न्यूनगंड बाजूला ठेवून आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात. आणि करिअरच्या माध्यमातून आपला विकास साधावा. असे प्राचार्य कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले. तर ज्या संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये आपण शिकलो, घडलो त्या संस्थेचा, कॉलेजचा व शिक्षकांचा आदर विद्यार्थ्यांनी नेहमी ठेवावा. वाचनाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात अधिकाधिक भर टाकावी. असे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.शिवदास टिंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले. प्रा. सुजित सपाटे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आप्पा हातेकर यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. सौ. अनिता निकम, कर्यक्रमाचे आभार प्रा. श्रीमती सारिका घाडगे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. माधुरी मोरे, प्रा. सौ.अश्विनी भगत, प्रा.
दिपाली अडसूळ , प्रा. सोनाली चौगुले. प्रा. आकाश जाधव सर इत्यादी उपस्थित होते.