Uncategorized

अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कारवाई

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- पंढरपुर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेवुन आज दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी तहसिलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

.

पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक यांनी नियमित तपासणी करून पंढरपूर येथील संत गाडगेबाबा चौकाच्या पुर्वेस चाकण दिंडी मठाच्या मोकळया जागेत असलेल्या पत्र्याच्या खोलीत अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळाल्याने तहसिल कार्यालयातील तलाठी मुसाक काझी कोतवाल प्रल्हाद खरे सदर ठिकाणी गेले असता या ठिकाणी ठिकाणी आनंद भानुदास जाधव वय – ३७ वर्षे रा. पंढरपूर या इसमास घरगुती वापरातील चार घरगुती सिलेंडर टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा (अंदाजे रक्कम १४ हजार ५००/- रू) या मुदेमालासह रंगेहात पकण्यात आले.

तसेच इंदिरा गांधी चौकातील नगरपालीकेच्या व्यापारी गाळयाच्या पाठीमागे पत्रा शेडमध्ये एका इसमाकडे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर साठा असुन, तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ पंचनामा करून सदर ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी गेले असता तेथे रोहित ग्यानबा शिंदे वय २० वर्षे रा . कडबेगल्ली, पंढरपूर जि. सोलापूर हा इसम हजर असुन त्याच्ये कब्जात पंचनाम्यातील ४ घरगुती गॅस सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार व गॅस मोजणीसाठी लागणारा वजनकाटा असे एकुण १८ हजार रुपयांची साहित्य मिळूण आले . याबाबत वेगवेगळे पंचनामे तयार केले असून. वरील कार्यवाहीत आनंद भानुदास जाधव वय ३७ वर्षे २) रोहीत ग्यानबा शिंदे ,(वय २० वर्षे) या दोघांविरूदध जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५
च्या कलम ३ व कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close