कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेची कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी प्रकाश वायदंडे तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ज्योती साठे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
———————————————————
इस्लामपूर:- दि.23 मे कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेची कार्यकारणी राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी आज जाहीर केली. निवड केलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रं देण्यात आली कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष म्हणून मा. प्रकाश बाजीराव वायदंडे(भूदरगड) तर महिला आघाडी कोल्हापूर जिल्हाअध्यक्षा म्हणून सौ ज्योती साठे (इचलकरंजी) यांची निवड करण्यात आली कागल तालुक्याचे अध्यक्ष प्रभू जिरगे तर शिरोळ तालुकअध्यक्ष मा राजू आवळे(चिपरी) हातकणंगले तालुकाध्यक्षा सरिता पारधे(इचलकरंजी) तर कागल तालुकाध्यक्ष रुक्मिणी आवळे (आणूर)यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सामाजिक अन्यायाच्या विरूध्द
वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेऊन आक्रमक होण्याचा सल्ला देऊन त्यांना पुढील वाटचालीस प्रा. सुभाष वायदंडे यानी शुभेच्छा दिल्या.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कागल तालुका अध्यक्षपदी रुक्मिणी आवळे
कागल:-आणूर(कागल) माळवाडी येथील सौ रुक्मिणी समीर आवळे यांची पुरोगामी संघर्ष परिषद महिला आघाडी कागल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसे त्यांना निवडीचे पत्र पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे यांनी नुकतेच दिले सौ रुक्मिणी आवळे यांच्या निवडीबद्दल पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे निवडी बद्दल बोलताना रुक्मिणी आवळे म्हणाल्या सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय राहून काम करत असताना तळागाळातील महिला व त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहीन.