भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची 111 वी जयंती भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर व वंचित बहुजन आघाडी पंढरपूर यांच्या वतीने साजरी..

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र चैत्यभूमीचे खरे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक, निर्माते सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मंगळवार दिनांक 12.12. 2023 रोजी 111 वी जयंती पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या प्रतिमेस समाधान जाधव भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष व संतोष कांबळे वंचित बहुजन आघाडी पंढरपूर तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच राहुल सर्वगोड शहराध्यक्ष , दत्तात्रय सरवदे संघटक यांच्या हस्ते दीप व धूप प्रज्वलित करून सामूहिक रित्या पंचशील त्रिशरण देण्यात आले. तसेच हनमंत बंगाळे यांनीच भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना असे सांगितले की १९६७ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी स्वतः भैयासाहेब यांनी श्रामणेरची दीक्षा घेतली. या काळात ते चैत्यभूमीतच राहिले. श्रामणेर दीक्षेत त्यांचे नाव महाश्यप पंडीत होते. धम्मचळवळ बाबासाहेबांच्या नंतर कुणी करावी. यासाठी नागपूरमध्ये बैठक घेऊन तिथे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्षपद भैयासाहेबांकडे देण्यात आले. सर्वांनी मिळून हा निर्णय नागपुरमध्ये घेतला.धम्मक्रांतीचा विषय भैयासाहेबांकडे सोपविण्यात आला. भैयासाहेबांनी हे काम आनंदाने स्वीकारले. तेव्हा पासून भैयासाहेबांनी रात्रंदिवस धम्माच्या कार्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वाहून घेतले.१९६८ साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभा पहिले अधिवेशन आयोजित केले. बौद्ध जीवन संस्कापाठ तयार करण्यासाठी समिती नेमली.या अधिवेशनात हा संस्कारपाठ स्वीकारण्यात आला.१९६८ नंतर त्यांनी आपल्या संस्थेत बौध्दाचार्य प्रथा सुरु केली. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेत बौध्दाचार्य हे पद निर्माण केले म्हणून त्यांना बौध्दाचार्याचे जनक म्हणतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या “जनता“व “प्रबुद्ध भारत” या मुखपत्राची जबाबदारी पेलणारे पत्रकार,भारत बौध्दमय करण्यासाठी धर्मांतराच्या माध्यमाने “अत्त दीप भव“चा संदेश देणारे धम्म प्रचारक,भारतीय बौध्द महासभेचे कर्तबगार द्वितीय अध्यक्ष चळवळीच्या अनेक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर कार्यरत असणारे लोकांचा आवाज सभागृहात बुलंद करणारे लोकप्रतिनिधी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर.
याचबरोबर कैलास ओव्हाळ वंचित बहुजन तालुका महासचिव यांनीही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रवि सर्वगोड जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड तालुका कार्याध्यक्ष मोहन वाघमारे तालुका संघटक राहुल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष कैलास ओव्हाळ तालुका महासचिव संतोष कांबळे तालुका अध्यक्ष हा कार्यक्रम प्रमोद वनसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमास सागर शेजाळ जिल्हा संरक्षण सचिव, आकाश शेळके तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील यांनीही विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी शरणात गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.