अभिजीत पाटील युवा संघर्ष यात्रेत नागपूर येथे झाले सहभागी
नागपूर येथील 12 डिसेंबर रोजी युवा संघर्ष यात्रेच्या विराट सभेची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर आ. रोहित पवार यांनी दिली जबाबदारी .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
प्रतिनिधी/-
राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे आज दि.१० डिसेंबर रोजी नागपूर येथे युवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काढलेल्या युवा संघर्ष पदयात्रेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, रोहित आर.आर.पाटील यांच्यसोबत सहभागी झाले असून दि.१२ डिसेंबर रोजी झीरो माईल, नागपूर येथे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा संघर्ष यात्रेचे सांगता समारोप होणार असल्याचे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
12 डिसेंबर रोजी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस असून देखील युवांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी 83 वर्षाचा योद्धा थेट नागपूर येथे युवांचा आवाज उठवण्यासाठी येत आहेत.
झिरो माईल नागपूर येथे दुपारी ठीक 2 वाजता देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीमध्ये भव्य विराट सांगता सभा होणार असल्याचे सांगितले. तेथील सर्व नियोजन चेअरमन अभिजीत पाटील यांच्या खांद्यावर असल्याने पाटील दोन दिवस अगोदरच नागपूर येथे दाखल झाले आहेत.