Uncategorized

पंढरपूर नगरपालिका निवडणूक नगराध्यक्षपदी प्रणिताताई भालके यांचा 11, 136 मतांनी विजय

भारतीय जनता पक्षाचे 20 तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 शहर विकास आघाडीचे 04 तर अपक्ष 01 नगरसेवक आले निवडून

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल आज दिनांक 21 डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी सीमा होळकर यांनी जाहीर केला. या निवडणुकीत नगराध्यक्ष पद व 36 नगरसेवकां पदासाठी मतदान झाले होते त्याचा निकाल आज लागला..या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार उभे राहिले होते.भारतीय जनता पक्षाच्या शामलताई शिरसट यांचे विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणितीताई भालके यांच्यात प्रामुख्याने लढत झाली होती.
प्रणिता ताई भालके यांना 34, 960 तर शामल ताई शिरसट यांना 23’824 मते मिळावी. तर अपक्ष उमेदवार कांचन तुळजाराम बंदपट्टे 908 जैतूनबी मुलाणी 443, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार भारती राजू शिंदे यांना 401 मिळाली.
यामध्ये तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या  उमेदवार प्रणिताताई भालके यांचा 11,136 विक्रमी मताधिक्याने विजय झाला.


नगरसेवक पदासाठी झालेल्या मतदानाचा निकाल पुढीलप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे 20 तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 शहर विकास आघाडीचे 04 तर अपक्ष 01 नगरसेवक निवडून आले आहे. नगराध्यक्ष पद हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे आले असून भारतीय जनता पक्षाचे 20व शहर विकास आघाडीचे 04 नगरसेवक निवडून आलेने नगरपालिकेत त्यांचे बहुमत झाले आहे. 24 नगरसेवक येऊनही क्रास मतदान झाल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजय होऊ शकला नाही.


या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष घातले होते. व निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी असा प्रयत्न केला. पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांची गेली 40 वर्षे नगरपालिकेवर पकड असून त्यांनी एक हाती सत्ता आघाडी करून अनेक वेळा मिळवली होती. परंतु पक्षाच्या पराकोटीच्या दबावामुळे त्यांना नाईलाजाने कमळ चिन्हावर निवडणूकीला सामोरे जावे लागले असे दिसत होते. दुसरीकडे विठ्ठल परिवाराचा एक संघ गट निर्माण करण्यासाठी आमदार अभिजीत पाटील विठ्ठलची माजी चेअरमन भगीरथ दादा भालके, भैरवनाथ शुगर चे चेअरमन अनिलदादा सावंत, मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, सहकार शिरोमणी वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आदींनी प्रयत्न केले. व सर्व संमतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता ताई भालकी यांचे नाव पुढे आले. कारखानदारी अडचणीत येते या भूमिकेतून विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी  सवता सुभा करून स्वतंत्र पॅनल उभा करण्यात प्रयत्न केला व त्यांनी बारा उमेदवार उभा केले. आरोप प्रत्यारोप करून व विकासाचा मुद्दा पुढे करून आपापल्या परीने प्रचार करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार समाधान दादा अवताडे,पांडुरंगचे सर्वेसर्वा प्रशांतराव परिचारक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख , शिवसेना शिंदे गटाचे साईनाथ अभंगराव, महेश साठे शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे, दलित संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देवकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहम्मद उस्ताद आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

सोलापूर मतदारसंघातील खासदार प्रणितीताई शिंदे यांनीही प्रचार रॅलीध्ये सहभाग घेतला होता.

नूतन नगराध्यक्ष प्रणितीताई भालके या प्रथमच नगरपालिकेमध्ये निवडून येत आहेत तसेच 36 नगरसेवकांमध्ये अनेक नवीन चेहरे यावेळी निवडून आलेले आहेत. पुढील पाच वर्षे त्यांना शहराच्या विकासासाठी अनेक आव्हानांना तोंड देऊन कार्य करावे लागणार आहे तरच जनतेला दिलेले आश्वासन पूर्णत्वाला जाण्यास मदत होईल. निवडणुकीपूर्वी केलेल्या आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र मिळून पंढरपूरचा विकास करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होतील. ही पंढरपूरकरांची अपेक्षा
विजयी उमेदवारांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close