पंढरपूर येथे अजिंक्य बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
विजेते - डॉ मर्दा व राजमाने सर, पांडुरंग अलोनी व सारंग अभंगराव, सुदाम तांदळे व बशीर मंनूर,

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर येथे अजिंक्य बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने
11 व 12 डिसेंबर 2021 रोजी दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
पंढरपूर:- येथील अजिंक्य बॅडमिंटन ग्रुप च्या वतीने दोन दिवस दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ,अकलूज, श्रीपुर, आटपाडी,परांडा, करमाळा, सोलापूर, जत
येथील 146 बॅडमिंटन खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला या स्पर्धा 35 45 व 55 वरील वयोगटातील स्पर्धकांसाठी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये विजेत्यांचा सत्कार युटोपीयन साखर कारखान्याचे एम डी व युवक नेते रोहन परिचारक, पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनील अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी व बसवेश्वर देवमारे, ओंकार वाळूजकर यांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये खालील विजेते ठरले
55 वर्षे वरील गटात
विजेते – डॉ मर्दा व राजमाने सर, मंगळवेढा
उप विजेते – बाळासाहेब कटकमवार व नंदू बडवे
पंढरपूर
45 वर्षे वरील गटात
विजेते – पांडुरंग अलोनी व सारंग अभंगराव, पंढरपूर
उप विजेते – डॉ मर्दा व
डॉ काळगी, मंगळवेढा
35 वर्षे वरील गटात
विजेते – सुदाम तांदळे व बशीर मंनूर, पंढरपूर
उप विजेते – डॉ अमित गुंडेवार व डॉ अमोल बनसोडे, पंढरपूर
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बॅडमिंटन कोच तुषार मुळे व अजिंक्य बॅडमिंटन ग्रुप चे सर्व सदस्य यांनी अतिशय परिश्रम घेतले.