फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर यांचे वतीने”धम्मचक्र प्रवर्तन दिन”या विषयावर व्याख्यान संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर यांचे वतीने ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन रविवार, दि. २९/१०/२०२३ रोजी स. ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंढरपूर येथे केले होते.. कार्यक्रमाचे सुरुवातीस डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात करुन तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेणेत आली.
यावेळी व्याख्याते प्रज्ञाबोधी सुभाष ढवळे (सर)(सल्लागार, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर) यांनी “धम्मचक्र प्रवर्तन दिन”या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबोधनत्मक व्याख्यान दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल वाघमारे(अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर) यांनी अध्यक्षीय भाषणात वैचारिक संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पाटोळे सर यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर मागाडे सर यांनी केले.
आभार राजेंद्र सर्वगोड यांनी मानले.
वरील कार्यक्रमास विचारमंचाचे सदस्य व आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, उपस्थित होते.


