Uncategorized
दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित गुजराथ कॉलनी येथे मोफत रोगनिदान शिबीर संपन्न

- जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल-श्रीकांत कसबे
- पंढरपूर :- विजयादशमी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित गुजराथ कॉलनी येथे मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उदघाटन नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकार यांचे हस्ते झाले. सदर शिबीरास डॉ स्नेहा रोंगे स्त्रीरोग तज्ञ, डाँ. अरुण मेणकुदळे त्वचा रोगतज्ञ,डॉ. ओंकार पावले अर्थोपेडीक सर्जन, र्डॉ ओजस देवकाते बालरोग तज्ञ,डाँ.रेश्मा करंडे नेत्ररोगतज्ञ,डॉ वृषभ फडे फिजिशियन, डाँ. अभिजित नामदे फिजिशियन, सूरज पावले, डोईफोडे आदी उपस्थित होते.
या शिबिरात 310लोकांची मोफत तपासणी करणेत आली शिबीर यशस्वी करणेसाठी गुरु दोडिया,महेश गोयल, सचिन, सोलकी यांनी सहकार्य केले.