सरपंच उपसरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्रच, ”पुणे विभागीय आयुक्तांनी निर्णय ठेवला कायम..’

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे येथील ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सह इतर दोन सदस्यांनी अतिक्रमण केल्याने सोलापूर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविल्याने संबंधित विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल करून दात मागितली होती यावर विभागीय आयुक्त पुणे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचा निर्णय कायम ठेवून अपील अमान्य करण्यात आली सविस्तर माहिती अशी उंबरे (पागे) गावचे सरपंच सौ.कांताबाई महादेव शिंदे यांनी व्यवसाय करण्यासाठी गावठाण जागेमध्ये अतिक्रमण करून गोडाऊन बांधले होते, तर उपसरपंच नागनाथ शंकर कानगुडे यांनी शासनाच्या गायरान जमीनी मध्ये अतिक्रमण करून इमारत बांधली होती, व महिला ग्रामपंचायत सदस्य सौ.माधवी सुनील हुबाले यांचे सासरे यांनी गावठाण स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करून इमारत बांधलेली होती तर ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव (बापू)कानगुडे यांच्या सख्या भावाने गावठाणा मध्ये व्यवसायासाठी गाळ्या बांधून अतिक्रमण केले होते त्यामुळे सरपंच उपसरपंच व इतर दोन सदस्य यांना अपात्र करण्यासाठी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते धनाजी तुकाराम शिव पालक व माणिक कसबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्यासाठी मागणी केली होती. उपजिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या अहवालानुसार सरपंच उपसरपंच दोन सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले सदर जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे सरपंच उपसरपंच व इतर दोन सदस्य यांनी अपील दाखल करून दात मागितली होती ,याबाबतची सुनावणी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण यांनी अपीलकर्त्याचे बाजू म्हणणे ऐकून घेऊन सबब पुराव्या अभावी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवून यांचे अपील अमान्य करण्यात आले व चारही सदस्य अपात्र करण्यात आले.