Uncategorized

अभिजीत पाटील यांना महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांकडून आदर्श चेअरमन पुरस्कार प्रदान

आदर्श चेअरमन पुरस्कार हा श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना समर्पित

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

प्रतिनिधी/-

भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक ज्यांनी अल्पवधीन काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उंच गरुड भरारी घेतली. कोणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये प्रकल्प बंद करून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरून आपल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करून लाखो जणांना जीवदान दिले. बारा वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५दिवसात सुरू करून आपल्या कामाची चुणूक दाखवली तसेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद अवस्थेत असताना उत्कृष्ट नियोजन व कामाची सचोटी लावून यशस्वी गाळप केले याच अनुषंगाने चेअरमन अध्यक्ष अभिजीत पाटील यांना दैनिक नवराष्ट्रने आदर्श चेअरमन पुरस्कार म्हणून घोषित केले आहे.

मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे दिनांक १२ऑक्टोबर रोजी दैनिक नवराष्ट्र समूह तर्फे आदर्श चेअरमन म्हणून अभिजीत पाटील यांना राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

“नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड २०२३” हा सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार स्वीकारताना आठवत झाली ती श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूकीची आणि सभासदांनी दाखवलेला विश्वासाची त्याच विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी श्री.अभिजीत पाटील कायम प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

पुरस्कार रूपाने या प्रामाणिक कार्याला समाज मान्यता मिळण्याचा आनंद आहेच.. पण त्याचे श्रेय सर्वस्वी सभासदांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला आहे. हा विश्वास वाढता रहावा यासाठी यापुढेही अविरत परिश्रम सुरूच राहतील असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना बोलले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close