महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पंढरपूर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-दिनांक 3 आक्टोंबर रोजी पंढरपूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे महाराष्ट्र,पक्षाचे नेते नारायण दादा गायकवाड,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र जाधव, युवा जिल्हाध्यक्ष भूषण ननवरे,पुणे जिल्ह्याचे अभिजीत गायकवाड, विकास भोसले,सोलापूर जिल्ह्याचे पूर्वीचे लखनजी भंडारे, महिला जिल्हाध्यक्ष सुशीला ताई गायकवाड, तुषार भोसले,कालिदास गायकवाड,रोहित भोसले,विनोद सरवदे, पंढरपूर तालुकाध्यक्ष हनुमंत ननवरे,गोरख प्रक्षाळे, आदी उपस्थित होते.
ह्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना संजय भैय्या सोनवणे यांनी कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता, निर्माण झाला पाहिजे असे सांगून कार्यकर्त्यांनी उद्योगातून व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शासनाच्या वतीने ज्या विविध योजना आहेत त्या मिळवून सक्षम बनले पाहिजे अशी भूमिका मांडली.