छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते–जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने शिरपूर (जिल्हा धुळे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना विक्रम चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, नवल पारधी जितेंद्र साळुंखे इ.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
शिरपूर:- (जि.धूळे)- बहुजन समाजाला सन्मानाची वागणूक देत असताना राजानी केवळ राजेपण न दाखवता बहुजनांचं प्रती पालकत्व स्वीकारलं होतं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण यांनी केले ते शिरपूर (जिल्हा धुळे) या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेने आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जितेंद्र (आबा) चव्हाण, धुळे जिल्हाअध्यक्ष जितेंद्र साळुंखे, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवल पारधी, दोंडाईचा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पारधी, धुळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशाबाई सामुद्रे, साक्री तालुकाध्यक्षा भाग्यश्री सेजवळ ,साक्री तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, शिरपूर तालुका अध्यक्षा शोभाबाई पवार, शिरपूर शहर अध्यक्षा लक्ष्मीबाई पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.