Uncategorized

सहा वर्षापासून खुन करून फरार झालेल्या आरोपीला पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीसांनी केले जेरबंद

 

 

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर :-दिनांक १३/०७/२०१६ रोजी गार्डी, ता. पंढरपूर येथील भागुबाई भाऊ साहेब अडगळे, वय ३५ वर्षे यास  पती  भाऊसाहेब भानुदास अडगळे याने त्याचे पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून तीस कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी करुन तिस ठार केले आहे व मयताची आई सोडवण्यास आली असता तीलाही आरोपीने कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे असे दादु मारुती केंजळे, वय ५० वर्षे, रा. पळशी, ता. पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पंढरपुर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ४४५/२०१६ भा.दं.वि. कलम ३०२, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयातील आरोपी  भाऊसाहेब भानुदास अडगळे, रा. गार्डी, ता. पंढरपूर हा गुन्हा घडले पासून मागील ६ वर्षापासून अद्याप पर्यंत फरार होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये फरार आरोपीचा शोध घेणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी  डॉ. अर्जुन भोसले व पोलीस निरीक्षक  मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील अंमलदार यांना योग्य सुचना देवुन सदर आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार हे त्याचा शोध घेत होते. परंतू तो मिळून येत नव्हाता.

आज दिनांक १६/०९/२०२३ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे अंमलदार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी  भाऊसाहेब अडगळे हा गार्डी गावामध्ये आहे अशी बातमी मिळाल्याने गोपनीय बातमीदाराच्या बातमी प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील अंमदार यांनी गार्डी गावात जावून त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन तपासीक अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी ही    शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण  हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, डॉ. अर्जुन भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व  मिलींद पाटील, पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इरफान शेख, पोलीस नाईक सज्जन भोसले, हणुमंत शिंदे यांनी केली असून त्याबाबत पुढील तपास पोलिस उप निरीक्षक वडणे, पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close