श्रीकांत कसबे यांना डाँ. बाबासाहेब आंबेडकर “प्रबुद्ध पत्रकार” पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय प्रबुध्द नाट्य परिषदेच्या विद्यमाने प्रबुध्द रंगभूमी सोलापूर आयोजित राज्यस्तरीय प्रबुध्द पुरस्कार वितरण सोहळा २०२३

–जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
सोलापूर :- भारतीय प्रबुध्द रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय प्रबुध्द नाट्य परिषदेच्या विद्यमाने प्रबुध्द रंगभूमी सोलापूर आयोजित राज्यस्तरीय प्रबुध्द पुरस्कार वितरण सोहळा 10सप्टेंबर 2023 रोजी संपन्न होणार असून जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे यांना स्मृतीशेष जनाबाई सैदू शिंदे यांचे स्मरणार्थ डाँ. बाबासाहेब आंबेडकर”प्रबुद्ध पत्रकार ” पुरस्कार जाहीर झाला असून अन्य क्षेत्रातील मान्यवारांचा देखील पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे.
उद्घाटक व पुरस्कार वितरण हस्ते : भीमपुत्र टेक्सास गायकवाड(प्रवर्तकः भारतीय प्रबुध्द सांस्कृतिक चळवळ)कार्यक्रमाचे अध्यक्ष : यु. एफ. जानराव(जिल्हाध्यक्ष, प्रबुध्द साहित्य परिषद, सोलापूर) हे उपस्थित रहाणार असून
प्रमुख पाहुणे अशोक बापू गायकवाड प्रदेशाध्यक्ष : भारतीय रक्षक आघाडी (सातारा), अंबादास शिंदे सर : संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र दलित पँथर ,संजय सायरे अध्यक्ष, प्रबुध्द नाट्य परिषद (महाराष्ट्र),हरिश्चंद्र डहाट : राष्ट्रीय सचिव द पिपल्स् ऑफ जम्बूदीप (बंगलोर) प्राचार्य गुलाब जगताप : प्रदेशाध्यक्ष : द पिपल्स ऑफ जम्बूदीप (बीड),डॉ. शंकरलाल गिहारा : नॅशनल ग्रॅन्ड मास्टर जीत कुने दो (नवी दिल्ली),डॉ. कुमार लोंढे राष्ट्रीय अध्यक्ष, मानवाधिकार संघटना (नवी दिल्ली) . मिलिंद कांबळे गुरुजी (बिदर) बाळासाहेब सरवदे (माजी डीवायएसपी) हे उपस्थित राहणार आहेत
यावेळी भीमशाहीर रामचंद्र जानराव यांना स्मृतीशेष फरीद अंकुश जानरावं यांचे स्मरणार्थ युग कवी वामन कर्डक प्रबुद्ध गीतकार /गायक पुरस्कार
डॉ. सुनिल रामटेके (नागपूर) यांना स्मृतीशेष रामचंद्र (भाऊ) एकनाथ ताकपेरे यांचे स्मरणार्थ आचार्य अश्वघोष “प्रबुध्द नाटककार” पुरस्कार
प्रा. डॉ. उत्तम कांबळे यांना स्मृतीशेष शांताई भाऊसाहेब गायकवाड यांचे स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर “प्रबुध्द संशोधक” पुरस्कार
डॉ. सुहास सरवदे यांना स्मृतीशेष केसरबाई लक्ष्मण गायकवाड यांचे स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर” प्रबुध्द चित्रकार” पुरस्कार
डॉ. औदुंबर मस्के यांना स्मृतीशेष नागनाथ रणधिरे (दलितमित्र) यांचे स्मरणार्थ क्रांतीबा जोतिबा फुले “प्रबुध्द अभिनेते “पुरस्कार
शंकरराव तायडे (पुणे) स्मृतीशेष सखुबाई विठ्ठल साबळे यांचे स्मरणार्थ क्रांतीबा जोतिबा फुले “प्रबुध्द क्रांतीनायक “पुरस्कार
आदी मान्यवारांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.
रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५ वा. स्थळ : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (A. C) सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
संयोजक : डॉ. कीर्तीपाल गायकवाड,निमंत्रक : प्रा. प्रियांका सितासावद, प्रबुध्द गायकवाड,निमंत्रक रामजी गायकवाड (जिल्हाध्यक्ष, प्रबुध्द नाट्य परिषद), अशोक साबळे, श्रीशैल रणधिरे,प्रशांत ताकपेरे, राजीव शिंदे, अॅड. राजरत्न जानराव, प्रा. क्षितिजा गायकवाड , स्वागताध्यक्ष पँथर फारुख, कार्याध्यक्ष अक्षय बबलाद,सुत्रसंचालन :कल्याण श्रावस्ती यांची समिती गठीत केली आहे .या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवहान संयोजन समितीने केले आहे.