संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त “घर घर संविधान” पोहचविणे गरजेचे –सुनील वाघमारे
फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने" संविधान "उद्देशीकिचे वाचन


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-26 जानेवारी 1950पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली व खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य सुरु झाले म्हणुन 26जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज प्रजासत्ताक दिनाचे 75वे वर्ष असून अमृत महोत्सव देशभर सुरु झाला असून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने “घर घर संविधान “हॆ अभियान सुरु केले आहे असे विचार विचारमंचचे अध्यक्ष सुनील वाघमारे यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले कीं वास्तविक पाहता स्वातंत्र्यांचा 75वी घर घर तिरंगा करणाऱ्या सरकारची ही जबाबदारी होती पण सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसते. आम्ही वर्षभर हॆ अभियान राबविणार असून तालुक्यातील सर्व प्रशालेला संविधानाची प्रत भेट देणार असून त्याचे महत्व पटवून सांगणार असून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यां दोन दिवसा बाबत जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच 26नोव्हेंबर रोजी तालुका पातळीवार मोठा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस किसन सरवदे सर यांचे हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्प हार अर्पण करण्यातआला. त्यानंतर संविधान प्रतीस अभिवादन करण्यात येऊन उद्देशीकिचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, खजिनदार दादासाहेब दोडके सर ,सह खजिनदार सिकंदर ढवळे सर सल्लगार श्रीकांत कसबे, राजेंद्र पाराध्ये, विठ्ठल कांबळे,संतोष सर्वगोड,सुकदेव माने, राजेंद्र सर्वगोड, रविंद्र सर्वगोड, गुरु दोडिया, कैलास ओव्हाळ, सा. ठिणगीचे संपादक रामचंद्र सरवदे आदी उपस्थित होते.



